पोलीस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी ८ आरोपी अटकेत

May 15,2021

बुलढाणा : १५ मे - भुमराळा बीबी येथील शेख रियास शेख सुभान यांनी एप्रिल महिन्यामध्ये त्यांचे मालकी च्या बकऱ्या  अंदाजे किंमत एकावन्न हजार रुपये च्या कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन बीबी येथे दाखल केली होती सदर चोरटे पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्या वरून पोलिसांनी 13 में रोजी खापरखेड घुले येथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर 14 जणांनी हल्ला केल्याची घटना घडली त्यानंतर अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ पाचारण करून ठाणेदार एल डी तावरे यांनी आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असता  दि 14 मे रोजी त्यांना न्यायालयात उभे केले दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे

बीबी येथील शेख रियाज शेख सुभान यांनी दि 20 एप्रिल रोजी त्यांच्या मालकीच्या अंदाजे 51 हजार रुपयांच्या बकर्या चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होताबकरी चोर हे बीबी पोलिस स्टेशन हद्दीतील खापरखेड घुले येथील असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार बिबी ठाणेदार एल डी तावरे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम व्यवहारे  पोलीस पथक खापरखेड घुले येथे आरोपीला ताब्यात घेण्यासाठी 13 मे रोजी गेले असता आरोपी गणेश संतोष राठोडसंतोष विष्णू राठोड ,काळू चंदु राठोडगजानन विष्णू राठोडचंदू रामचंद्र चव्हाणबाळू राठोड यासह 14 जणांनी पोलिसावर हल्ला करून सरकारी कामात संदर्भाने शासन नियमाचे उल्लंघन केले म्हणून वरील आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन चे अंमलदार पो ना अर्जुन सांगळे यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल करून ठाणेदार एल डी तावरे यांनी आठ जणांना ताब्यात घेतलेउर्वरित आरोपी राजू राठोडगणेश राठोडसुनील राठोडगजानन राठोडपूजा चव्हाण सहा आरोपी फरार आहे.