संचारबंदीत माॅलमधील हाॅटेल सुरू, उपायुक्त विनीता साहू यांनी टाकली धाड

April 17,2021

नागपूर: १७ एप्रिल-  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.   यामध्ये मॉलमधील हॉटेलही बंद ठेवण्यात आले आहे.  मात्र ऑनलाइन फूडला पवानगी देण्यात आली आहे.  मात्र शुक्रवारी व्हेरायटी  चौक  नाकेबंदी सुरू असताना विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशी केली.  यामध्ये तिघे जण मॉलमधील हॉटेलमध्ये जात असल्याचे दिसून आले यामुळे पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी व्हेरायटी  चौकातील इटर्निटी मॉलमध्ये जाऊन पाहणी केली.  हॉटेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त जण असल्याचे दिसून आले .
यादरम्यानए मॉलमध्ये वरच्या माळावर असलेल्या हॉटेलमध्ये जास्त कर्मचारी आढळून आले- त्यामुळे  त्यांना 50 टक्केच कर्मचारी बोलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे-.  असेही पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी सांगितले  तसेच ही माहिती मनपा प्रशासनाला देण्यात आली आहे.   यावर नियानुनार कारवाई होईल.  असेही पोलीस उपायुक्त साहू यांनी सांगितले.