महाराष्ट्रभूषण पुरस्कार निवड समितीवर डॉ. प्रकाश आमटे

October 17,2020

नागपूर, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्रभूषण पुरस्कार निवड समितीवर अशासकीय सदस्य म्हणून प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, उद्योजक बाबा कल्याणी, माजी क्रिकेटपटू संदीप पाटील व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एखाद्या क्षेत्रात उच्चतम कामगिरी करणार्‍या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची योजना सुरू करण्यात आलेली ाहे. हा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणार्‍या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सदर पुरस्कार्थींची निवड केली जाते. राज्यातील सर्व विभागातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या सर्व समित्यांवरील सर्व अशासकीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका रद्द करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवपड समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. समितीची पुनर्रचना करण्यात आली असून, या सर्व अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती पुढील तीन वर्षे कालावधीसाठी असणार आहेत. समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री, उपाध्यक्ष,उपमुख्यमंत्री असतात तर सांस्कृतिक कार्यमंत्री, राज्यमंत्री व सांस्कृतिक कार्य सचिव हे कायम सदस्य असतात.